राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

| उरण | वार्ताहर |

पारस काव्य,कला,जनजागृती संस्था (रजि.) सानपाडा, नवी मुंबईतर्फे राज्यस्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-2023 चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ऐंशी गुणवंतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

पुरस्कार सोहळ्याचे हे तेरावे वर्ष होते. पुंडलिक म्हात्रे यांना विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिध्द निवेदक प्रा.शंकर गोपाळे यांना सर्वोत्कृष्ठ निवेदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय काव्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून दोनशेहून अधिक कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला होता. प्रथम तीन क्रमांकाच्या कवींना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधू बांडे, गणेश सलवदे, संजय बर्वे, पुंडलिक म्हात्रे उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष मंगेश चांदिवडे, शोभा चांदिवडे यांनी आयोजन केले होते. शंकर गोपाळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Exit mobile version