| पाली/गोमाशी | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती, सकल सुतार समाजाच्या वतीने रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता फुटवाले धर्मशाळा, 332 प्रदक्षिणा रोड, संत आळंदी देवाची, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपस्थीत राहणार आहेत. या महामेळाव्याला राज्यातील 36 जिल्ह्यातील सुतार समाज बांधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहणार आहेत, असे विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे विद्यानंद मानकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेस हनुमंतराव पांचाळ, पिजी सुतार, दिलीप अकोटकर, भगवान राऊत आणि प्रदीप जाणवे आदी उपस्थित होते.







