राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

चॅम्पियन्स कराटे क्लब रायगड तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा श्रीवर्धन येथील कुलकर्णी सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यातील साधरण 200 मुला-मुलींनी सहभाग नोंदविला होता. चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शन खाली होणार्‍या या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मधुकर ढवळे, नॅशनल हॉली बॉल प्लेअर अजित मापुस्कर तसेच अ‍ॅड. संतोष साप्ते उपस्थित होते. यावेळी साऊथ एशियन गोल्ड मेडलिष्ट कुमार प्रसाद अवघडे यांचा सत्कार करण्यात आला.

कराटे स्पर्धेत वेगवेगळ्या गटात अव्वल ठरलेल्या गटातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, रायगड जिल्ह्याकडून खेळणार्‍या विक्रांत खांडेकर, विहान विचारे, रूजुला यवतकर, मृदूनी जोशी या खेळाडूंचा आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सिनियर गटात शंतनु जाधव आणि साक्षी तांडलेकर हे खेळाडू अव्वल ठरले आहेत. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक महाड, द्वितीय पारितोषिक श्रीवर्धन-म्हसळा आणि तृतीय पारितोषिक मुंबई या संघाने पटकाविला आहे.

Exit mobile version