| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसळा नं.1 च्या मुख्याध्यापिका तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा म्हसळाच्या तालुकाध्यक्षा ,पेण शिक्षक पतपेढी च्या विद्यमान संचालिका सौ.सुमित्रा विलास खेडेकर यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्याकडून 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका म्हणून पुरस्कार देण्यात आला.
आविष्कार फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय पवार, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोपान चांदे या सर्वांच्या उपस्थितीत सुमित्रा खेडेकर यांचा सन्मान करण्यात आला. खेडेकर यांनी म्हसळा आणि पनवेल तालुक्यामध्ये पंचवीस वर्षपेक्षा अधिक सेवा करत असताना अनेक उपक्रम यशस्वी रित्या राबविले आहेत.म्हसळा येथे सेवा देत असताना सुरई आणि म्हसळा नं.1 या शाळांवर काम केले. दहीहंडी, वाचन सप्ताह असेल महावाचन उपक्रम परसबाग, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रमातून विद्यार्थी घडवत आहेत. त्यांच्या अशा चांगल्या उपक्रमांचा मागोवा घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे म्हसळा तालुका आणि रायगड जिल्ह्यात कौतुक केले जात आहे. त्यांच्या सोबतच बालाजी राठोड विषय शिक्षक वरवठणे मराठी, बशीर अहमद उल्डे केंद्रप्रमुख पाभरे, तब्बस्सूम कोंडविलकर, प्रफुल्ल पाटील, पीएनपी हायस्कूल पाष्टी मिणेकर सर नेवरुल, अब्दुल कयुम मुकादम जनाब, जावेद हजवाने, अश्विनी गुंडरे, अबिना बागवान यांनाही गुणवंत शिक्षक शिक्षिका म्हणून गौरव करण्यात आला.