स्व. प्रभाकर पाटील यांच्या कार्याला उजाळा
| अलिबाग । वार्ताहर ।
को.ए.सो.लक्ष्मी-शालिनी कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालयात ग्रामपंचायत आंबेपूरच्या सहकार्याने स्व.प्रभाकर पाटील तथा भाऊ यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.
ग्रामपंचायत आंबेपूरच्या सरपंच सुमन पाटील यांच्या कल्पकतेने स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या विचार आणि कार्यांची नव्या पिढीला ओळख व्हावी. महाराष्ट्रातील नव्या वक्त्यांचा शोध घेणे आणि गुणवंतांच्या गुणवत्तेला प्रोत्साहित करणे आणि पाठीवर शाब्बासकीची थाप देणे हे भाऊंचे कार्य पुढे नेणे, अशा अनेक उद्देशांच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायत आंबेपूरच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 48 स्पर्धकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 31 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. या सहभागातून झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक जे.एन.पालीवाला महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन दिनेश गुप्ता याने प्राप्त केला. पाच हजार एक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक पी.एन.पी. महाविद्यालयाचा विद्यार्थी वेदांत दिलीप कंटक यांने प्राप्त केला. तीन हजार रुपये एक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक को.ए.सो. लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कांचन मोहिरे हिने मिळविला. दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह विजेत्याना देण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन कोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. दिलीप पाटील, डॉ. अनिल बांगर, प्रा. कमलाकर फडतरे, वैभव ठाकूर ग्रामसेवक यांच्या संयोजन समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. चित्रा पाटील, पंडित शेठ, फाउंडेशनचे अध्यक्ष सवाई पाटील, राजिप माजी सदस्या भावना पाटील, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह सिद्धार्थ पाटील व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन लाभले होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत आंबेपूरचे सर्व कर्मचारी महाविद्यालयातील प्रा.डॉ.संगीता चित्रकोटी, डॉ.भटू वाघ, प्रा. दिलीप सोनवणे, प्रा. संतोष बिरारे, शोभा टेमकर, निलेश कुलाबकर, सारिका म्हात्रे, समीर पाटील, जयंत वालेकर, ज्योत्स्ना पाटील, एन.एस.एस विद्यार्थिनी यांचे सक्रिय योगदान लाभले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून उमाजी केळूसकर, प्रकाश म्हात्रे, प्रा. महेश बिराडे यानी काम पाहिले.