कोमसाप आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धा उत्साहात

| उरण | वार्ताहर |

युवा कवी, ज्येष्ठ कवी यांना योग्य व्यासपीठ मिळावे, नागरिकांना जनतेला कवितेची गोडी लागावी. कविता विषयी समाजात जनजागृती व्हावी या अनुषंगाने तसेच, मधुमन कट्ट्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद उरणतर्फे दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी येथे 100 वे कवी संमेलन, राज्यस्तरीय काव्य स्पर्धा, मधुबन कट्टा गौरव दिन, मान्यवरांचा सन्मान सोहळा, वाड्ंमयीन पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सदर राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे उदघाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्‍वस्त रमेश किर यांच्या हस्ते झाले. कोमसाप अध्यक्ष नमिता किर, विरोधी पक्ष नेते मनपा पनवेल प्रीतम म्हात्रे, निलेश भरत म्हात्रे, सदानंद गायकवाड, हसुराम म्हात्रे, इंडिया झिंदाबादचे अध्यक्ष रमेश थवई , शिक्षक पतपेढी पेण चेअरमन रविंद्र पाटील, संदेश गावंड, विकास पाटील, साहेबराव ओहोळ, सूर्यकांत दांडेकर, सुरेश ठाकूर, सदानंद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला. तर रायगड जिल्हा कोमसाप अध्यक्ष सुधीर शेठ, गणेश कोळी, संजय गुंजाळ, प्रकाश राजोपाध्ये, अविनाश जंगम, चंद्रकांत गायकवाड, प्रसाद पाटील, विकास पाटील, मनोज गावंड, किशोर कडू या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाले.

संमेलन अध्यक्ष रायगड भूषण प्रा.एल.बी. पाटील, मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, कोमसाप उरणचे अध्यक्ष मछिंद्रनाथ म्हात्रे, मधुबन कट्टा अध्यक्ष भ.पो. म्हात्रे, कोमसाप उरण कार्याध्यक्ष रंजना केणी, कोमसाप उरण सचिव अजय शिवकर, कोमसाप महिला प्रतिनिधी समता ठाकूर, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर तसेच, कार्यकारिणी सदस्य- किशोर पाटील, देविदास पाटील, भरत पाटील, रमण पंडीत, अनिल भोईर, संजीव पाटील, चेतन पाटील, दौलत पाटील, मीना बीस्ट, शिवप्रसाद पंडीत, मधुबन कट्टा सदस्य यांनी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सत्र निहाय सूत्रसंचालन शर्मिला गावंड, महेंद्र गावंड, जगदिश गावंड किशोर पाटील, संजीव पाटील, रंजना केणी, दर्शना माळी, संजय होळकर यांनी केले, तर काव्य स्पर्धेचे परीक्षण प्रा.ए.डी.पाटील, साहेबराव ठाणगे, इशान संगमनेरकर यांनी पाहिले.

Exit mobile version