राज्य एम.एड. कृती समितीचे : शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. पवार यांची महाराष्ट्र राज्य एम.एड. कृती समिती, जिल्हा शाखा-रायगड यांचे वतीने भेट देण्यात आली. जिल्हा परिषदेमधील एम.एड. व एम.ए.(एज्युकेशन) पदवीधर प्राथमिक शिक्षकांची संकलित करण्यात येत असलेल्या माहितीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याबाबत माननीय शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पुरवणी पत्र देऊन सदरची माहिती अचूक व योग्य संकलित करण्याविषयी निर्देश देण्यात येतील असे सांगितले. पुर्व परवानगी व कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव त्वरीत मंजूर करणार असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. भेटीसाठी अध्यक्ष बिपीन साळवे, नितीश पाटील, कृष्णकुमार शेळके, अंजली गांधी, नितीन पाटील उपस्थित होते.

Exit mobile version