राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

। कोल्हापूर । प्रतिनधी ।

पुण्याच्या सुखबिंदर कटनोरियाने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संदीप देवरुखकर याला पराभूत करताना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत आगेकूच केली. श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम येथे ही स्पर्धा सुरू आहे. तिसर्‍या फेरीच्या लढतीत सुखबिंदर कटनोरियाने संदीप देवरुखकरचा 15-12, 25-11 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आणि चौथी फेरी गाठली. तत्पूर्वी नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. इतर लढतींमध्ये पंकज पवार, अशोक गौर व फहिम काझी या मुंबईच्या खेळाडूंनी विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. रवींद्र हांगे, रहीम खान, प्रकाश गायकवाड या पुण्याच्या खेळाडूंनीची प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.

Exit mobile version