उरण काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

। उरण । वार्ताहर ।

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमधील काँग्रेस कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध करण्यात आला. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून, तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. तसेच केंद्र सरकारने अग्निपथ नावाची निरर्थक योजना आणली आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा काँग्रेस कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, विनोद म्हात्रे, रेखा घरत, प्रकाश पाटील यांनी केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका केली व नायब तहसीलदार नरेश पेडवी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी मिलींद पाडगावकर, भालचंद्र घरत, विनोद म्हात्रे, प्रकाश पाटील, कमलाकर घरत, संध्या तठाकुर, अंबरीन मुकरी,रेखा घरत,अफशा मुकरी, निलेश मर्चंडे, जयवंत पडते, यशवंत घरत, संदानंद पाटील, सुनील काटे, शैलेश तामगाडगे, रमेश पाटील, जयंत पडते, विनोद कदम, हितेन घरत, सुभाष जोशी, रमेश पाटील,चंद्रकांत म्हात्रे, रणजित पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version