मविआकडून कोलाड पोलिसांना निवेदन

। कोलाड । वार्ताहर ।

मागील काही महिन्यांपासुन संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात महिलांनावर होणारे अत्याचार व लैंगिक त्रासाच्या घटनेचे प्रकार वाढले आहेत. यातच बदलापूर येथील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचाराचा प्रकार घडला आहे. या गुन्हेगारावर कठोर कार्यवाही व्हावी, तसेच रोहा तालुक्यातील वरसे येथील एका लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न झाला आहे. अशीच एक घटना पाली येथे घडली आहे. यामुळे पालक वर्ग व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त पथकाच्या फेर्‍या वाढवण्यात याव्यात, तसेच लहान मुले जेथे शिकत आहेत त्याशाळेत सी. सी. टीव्ही वापरण्यासाठी आदेश द्यावा, यासाठी महाविकास आघाडीकडून कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना निवेदन देण्यात आले.

तसेच, चंद्रकांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार कुलदीप सुतार, गणेश वाचकावडे, संजय कुर्ले, सरपंच समीर महाबळे, योगेश सानप, ज्ञानेश्‍वर खामकर, बाळशेठ धनावडे, गणेश शिंदे, वैभव जैतपाळ, संदीप माने, प्रणित तेलंगे यांच्या उपस्थितीत बदलापूर येथील प्रकरणात महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक विलंब करीत असून या बाबीचा काळ्या फित बांधून निषेध केला.

Exit mobile version