कर्जत औषध विक्रेते संघटनेचे निवेदन


| नेरळ | प्रतिनिधी |

आरोग्य मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप राज्यातील औषध विक्रेते यांच्याकडून होत आहे. त्याबद्दल कर्जत तालुका केमिस्ट संघटनेच्या वतीने आ.महेंद्र थोरवे यांना निवेदन दिले.

राज्यातील केमिस्ट यांच्याकडून हप्ते वसुली होत असल्याचा आरोप होत असून कर्जत ; तालुक्यातील केमिस्ट यांना देखील असाच अनुभव येत असल्याने त्याबाबददल संघटनेच्या वतीने थोरवे यांची भेट घेऊन त्या बाबतीतील विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यावेळी केमिस्ट विभागाचे मुंबई झोन खजिनदार दिनेश सोलंकी, केमिस्ट संघटनेचे कर्जत तालुका अध्यक्ष शेखर बोराडे, संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष विजय परमार, यांच्यासह आयुब तांबोळी, विवेक जोशी, प्रतुल म्हात्रे, स्वप्नील लिंडायत, कमलेश जैन, रामराव पाटिल, दीपक जैन, राकेश जैन, प्रवीण जैन, अनील जोशी, विशाल सोलंकी, जगदीश पालकर, रूपेश गाँधी, संदीप पाटिल, संदीप बोराडे, विशाल गाँधी, मदनसिंग, तसेच सर्व केमिस्ट यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली.

Exit mobile version