आरोपीला फाशी व्हावी

आदिवासी बांधवांचे पोलिसांना निवेदन

| कोलाड | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोरबे गावच्या हद्दीतील सुर्ला आदिवासीवाडीतील एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सदर पीडित मुलगी घरी जात असताना सदर आरोपीने तिला बंद पडलेल्या मोरबा गावाजवळील कत्तलखान्यात नेऊन अत्याचार केला होता. माणगाव पोलिसांनी याबाबत तात्काळ आरोपी हुसेन मुखतार ढागू (24) रा. मोरबा याच्या मुसक्या आवळल्या.

या घटनेचा रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून माणगाव पोलीस ठाण्यात रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड व माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाजसेवा संघटना यांच्या विद्यमाने पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याला जामीनसुद्धा मिळू नये यासाठी समस्त आदिवासी बांधवांकडून निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवा पवार, सचिव राम कोळी, माणगाव आदिवासी कातकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदुताई पवार, ताराताई जाधव, मारुती पवार, काशीराम वाघमारे, नगरसेविका लक्ष्मी जाधव, शंकर कोळी, माणगाव युवक अध्यक्ष अमित कोळी, वनमित्र चंदर वालेकर, अनिता जाधव, मंगल वाघमारे, देवका कोळी, जमुना जाधव, राजेश कोळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version