विभागीय नियंत्रण अधिकार्‍यांना निवेदन

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जाणार्‍या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या उड्डाण पुलावरून जातात. याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत आहे. तसेच, सर्वसामान्य प्रवासी वर्गाला रामवाडी येथे उतरून दुसर्‍या गाडीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एसटी बसेस या उड्डाणपुलाच्या खालून नेण्यात याव्यात, असे लेखी निवेदन विश्‍वास बागुल यांनी पेणच्या विभागीय नियंत्रण अधिकार्‍यांना दिले आहे. तसेच पेण, वडखळ, नागोठणे, पाली अशा असंख्य एसटी स्टॅन्डमध्ये पावसाळ्यात अतिशय बिकट अवस्था असते. येथे विद्यार्थी, तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन स्टॅन्डची डागडुजी करावी, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Exit mobile version