। रसायनी । वार्ताहर ।
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने व सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मानवहित लोकशाही पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष रसायनी येथील कृष्णा झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी रायगड व खालापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ज्या समाजकंटकाने पुतळ्यास विरोध केला व ज्या अधिकार्याने समाज बांधवांना लाठीमार केला त्या अधिकार्यास अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन रायगड जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष कृष्णा झोंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा अधिकारी पद्मश्री बैनाडे व खालापूर तालुक्याचे नवनिर्वाचित तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिंदुराव बाबर, जिल्हा सचिव विजय भाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप कसबे, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
मानवहित लोकशाही पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन
