। चंदगड । प्रतिनिधी ।
यावर्षी चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यात खराब हवामानामुळे काजू पीक केवळ दहा टक्केच असल्यामुळे काजू उत्पादक शेतकरी यावर्षी नुकसानीत आला आहे. असलेला काजू डागी व काळवंडले आहे. त्यामुळे कोकणातील हापूस प्रमाणे प्रती झाड नुकसान भरपाई देण्यात येते. त्याच आधारे किमान चार हजार रुपये प्रती झाड नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने तातडीने द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्या नावे निवेदन गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे याना प्र. विजयभाई पाटील, संतोष पारथी, धोडीबा गावडे, लक्ष्मण गावडे, अनंत उप्पळकर, यानी दिले.
काजू नुकसानीचे मुख्यामंत्र्याना निवेदन
