वाढत्या डेंग्यूबाबत पालिकेला निवेदन

| कर्जत | प्रतिनिधी |

डेंग्यू या विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्या कारणाने कर्जत शहरात डेंग्यूची रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्‍वभूीवर आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी कर्जत शहर शिवसेना (शिंदे) गटाच्यावतीने डेंग्यू या विषानुवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले.

ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचे काम चालू आहे त्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त प्रमाणात असतो त्याही ठिकाणी अळ्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण कर्जत शहरात औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.

Exit mobile version