। चिपळूण । प्रतिनिधी ।
गुजरात राज्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये रंधीकपूर या गावांमध्ये दोन मार्च 2002 साली बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याप्रकरणी जे अकरा आरोपी आजन्म जन्मठेप सजा भोगत होते. अशा नराधमांना गुजरातच्या भाजप सरकारने माफीच्या धोरणाखाली 15 ऑगस्ट रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारच्या या कृत्याचा जाहीर निषेध करून, तसेच या घटनेतील सर्व 11 आरोपींना कठोरात कठोर अशी शिक्षा होण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अनुजा राजे भोसले, सावर्डे गावच्या सरपंच समीक्षा बागवे, महिला सुरक्षा संघटना (नवी दिल्ली) चिपळूण तालुका अध्यक्ष साक्षी गावणंग, ग्रामपंचायत उपसरपंच जमीर मुल्लाजी, ग्रामपंचायत माजी सदस्य तसेच इंदिरा काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मज्जिद भाई मुल्लाजी आदींसह कार्यकर्ते, महिला युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.