रायगडच्या कर्मचार्यांचाही सहभाग
कोर्लई | वार्ताहर |
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱी महासंघातर्फे कोल्हापूर येथील बिंदू चौकात बेमुदत धरणे आंदोलनाला दि.1 जानेवारी पासून सुरुवात झालेली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार महासंघातर्फे करण्यात आला आहे.
अभय यावलकर समितीच्या शिफारशी मान्य करून ग्रा.पं. कर्मचार्यांना वेतनश्रेणी त्वरीत लागु करा,10 ऑगस्ट 2020 रोजी कामगार विभागाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनासाठी वाढीव आर्थिक तरतुद करुन फरकाच्या थकित रक्कमेसह शासन अनुदान कर्मचार्यांच्या खात्यात जमा करा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बिंदू चौकातील जनसंपर्क कार्यालयासमोर कोल्हापूर येथे राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
रविवारी 2 जानेवारीला रायगड जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील झाले होते. या आंदोलनाच्यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा तानाजी ठोंबरे, सरचिटणीस नामदेव चव्हाण, कार्याध्यक्ष . मिलींद गणवीर, नामदेव गावडे, दिलीप पवार, सतिश कांबळे , गिरीष फोंडे, मंगेश म्हात्रे, ए .बी. कुलकर्णी ,बबन पाटील, सखाराम दुर्गुडे, अँड.राहुल जाधव, निळकंठ ढोके, शाम चिंचणे, किरण पांचाळ, वसंत वाघ, गोविंद म्हात्रे ,उज्वल गांगुर्ड, शिवाजी पाटील, भिकाजी पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत.







