कॅग भवनमध्ये सरदारांचा पुतळा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑडिट दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅगच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅगच्या मुख्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मोदी म्हणाले की, आतापर्यंत संस्थेच्या कामांवर शंका घेतली जात होती. पण आमच्या प्रामाणिक कामामुळे आधीच्या सरकारचा खरा चेहरा समोर आला असंही मोदी म्हणाले.कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, देशात आधी बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता कमी होती. वेगवेगळ्या प्रकारे काम चालायचं. यामुळे बँकांच्या एनपीएमध्ये वाढ झाली. एनपीए झाकण्याचे काम केले गेले. पण आम्ही देशासमोर खरं काय ते ठेवलं. अडचणी आणि त्रुटी समजून घेतल्याने त्यावर उपाय शोधता आला असंही मोदी म्हणाले.

Exit mobile version