सॅटेलाईटद्वारे आता सीमेवर 24 तास ‘जागते रहो’

उपग्रह निर्मितीची भारताकडून तयारी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

युद्धतंत्र अधिकाधिक तंत्रज्ञानाभिमुख होत चाललेलं असताना अखंड आणि सुरक्षितरित्या कम्युनिकेशन होणं, हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळेच येत्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक उपग्रह अवकाशात सोडण्याचं उद्दीष्ट भारतानं ठेवले असून, त्याद्वारे सीमेवर 24 तास जागते रहो ठेवले जाणार असल्याची माहिती संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे.

हे उपग्रह केवळ कम्युनिकेशनसाठी नसतील तर ते भारताच्या सीमांवर चोवीस तास देखरेख देखील करणार आहेत. सध्या याच गोष्टीची देशात कमतरता आहे, असंही सूत्रांनी सांगितलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख खरेदी समिती म्हणजेच स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि विकसित केलेल्या GS-T 7 B साठी आवश्यकता मान्य केली आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण झाल्यानंतर हा लष्कराचा पहिला असा कम्युनिकेशन सॅटेलाईट असेल जो फोर्स मल्टीप्लायर म्हणून कार्य करेल युद्ध परिस्थितीमध्ये त्याचा खूप फायदा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, GS-T 7 B सॅटेलाईटची मागणी आर्मीकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. हे सॅटेलाईट येत्या दोन-तीन वर्षांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या सॅटेलाईटमुळे कम्युनिकेशन होणं सहज सोपं होणार आहे. नेव्ही आणि एअरफोर्स यांच्यामधीलही कम्युनिकेशन सोपं होणार आहे.

Exit mobile version