रेवदंडामध्ये चाकुचा धाक दाखवून चोरी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा आगरकोट किल्लात चाकूचा धाक दाखवून हेल्मेटधारी चोरट्याने एक वयोवृद्ध महिलेला लुटले. तिच्याकडील दागिने व रोख रक्कम असाएक लाख पंचवीस हजार रुपयांचा ऐवज पाणी पिण्याचा बहाणाकरत रात्रीच्यावेळी लंपास केला.

शनिवारी (दि.1) सत्तर वर्षीय रेश्मा रमेश पाटील या वयोवृध्द विधवा महिला एकटयाच रहातात, रात्री बारा ते दिडचे सुमारास अज्ञात हेल्मेटधारी मोटरसायकलस्वाराने घराचा दरवाजा ठोकावला व पाणी पिण्यासाठी मागीतले, पाणी देण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता, अज्ञात हेल्मेटधारी घरात शिरला व चाकुचा धाक दाखवित त्यांचे हातपाय नायलॉनचे दोरीने बांधून तोंडात कापसाचा बोळा कोंबून त्याचे कानातील सोन्याच्या कुडया काढून घेतल्या व घरातील कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेल्या डब्यातील सोन्याची बोरमाळ तसेच, रोख रक्कम 25 हजार रूपये असा एकूण 1 लाख 25 हजार रूपये किमंतीचा माल चोरी करून महिलेस किचन रूममध्ये बांधून व कोंडून पळून गेला.

याबाबत रेश्मा रमेश पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली असून अज्ञात हेल्मेटधारी चोरटयाचे विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अलिबाग येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी यांनी घटनास्थळी येवून तपास केला असून रेवदंडा पोलिस ठाण्याचे सह. पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version