नागोठण्यात बकऱ्यांची चोरी

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे येथील आझाद मोहल्ला भागातून तीन बकऱ्या व एक बोकड अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत बकरी मालक जोहेब दादामिया कुरेशी (35) नागोठणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नागोठणे येथील आझाद मोहल्लात अज्ञात चोरटयाने कुरेशी यांच्या सोजत जातीची एक बकरी व एक बोकड, तसेच इंदोरी जातीची व शिरोही जातीची एक-एक बकरी अशा एकूण 35 हजार रुपये किमतींच्या बकऱ्या चोरून नेल्या आहेत.

याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. संतोष म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version