| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील पदे रिक्त असतानाही पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. अली असगर कलमुवाला यांच्या र्गदर्शनाखाली कर्जत पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम काळे, पशुधन पर्यवेक्षक विकास राठोड हे गेल्या आठवडाभर रात्रंदिवस खेड्यापाड्यात फिरून लंपी रोगावर योग्य उपचार करून रोगाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. लंपी रोगाच्या निमित्ताने पशुधन विकास विभागामार्फत वंध्यत्व निवारण शिबिरामध्ये लसीकरण व उपचार करत आहेत. पशुपालकांना मार्गदर्शन करत असल्याचे आढळून आले आहे. याकरिता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित केल्याचे डॉ.आसाराम काळे यांनी सांगितले.







