पोलीस भरतीत स्टेरॉईडचा वापर

चार उमेदवारांवर गुन्हा दाखल

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यात पोलीस भरती प्रक्रीया सुरु आहे. या पोलीस भरतीत मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. 19 जूनपासून पोलीस भरती सुरु आहे. परंतू या पोलीस भरतीत आता मैदानी चाचण्यात तरुणांना जादा गुण येण्यासाठी स्टीरॉईड जवळ बाळगल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात चार उमेदवारांवर गुन्हा दाखल केला आहे. एकूण 17 हजार पदासाठी 17 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

मीरा-भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत राबवण्यात येणारी भरती पारदर्शकरित्या संपन्न झाली आहे. पारदर्शक पणे भरती पार पडावी यासाठी लाचलूचपत विभाग, नार्कोटिक्स विभाग, देखील मैदानात उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या उत्तेजक पदार्थांचे सेवन मैदाणी चाचणीला येताना उमेदवारांनी करू नये, असे आयुक्तालयाच्या मार्फत सांगण्यात आले होते. मात्र मैदानी चाचणीला येताना चेकिंग दरम्यान 4 पुरुष उमेदवार यांनी मैदानी चाचणी दरम्यान चांगले गुण मिळवण्यासाठी स्टीरॉईड सोबत बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या चारही उमेदवारांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version