स्मिथचा अप्रतिम झेल टिपला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅटर स्टीव्हन स्मिथ याने इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात संयमी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडमधील ड्युरॅम काउंटी येथील चेस्टर-ल-स्ट्रीटच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथनं 5 चौकाराच्या मदतीने 82 चेंडूचा सामना करताना संघाच्या खात्यात 60 धावांची भर घातली. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला.

परफेक्ट शॉट सिलेक्शनसह क्षेत्ररक्षक नसलेल्या जागेत हा अप्रतिम फटका खेळला होता. पण इंग्लंडच्या ताफ्यातील ब्रायडन कार्स याने चपळाईचा नजराणा पेश करत त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यामुळे स्मिथच्या खेळीला ब्रेक लागला. सीमारेषवर इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकाने दाखवलेल्या चपळाईमुळे रंगात आलेल्या स्मिथचा बेरंग झाला अन् त्याचा चेहरा पडला. तो अगदी निराश होऊन तंबूत परततला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 35 व्या षटकात स्मिथ आणि विकेट किपर बॅटर अ‍ॅलेक्स कॅरी ही जोडी अगदी सेट झाली होती. जोडी फोडण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकनं चेंडू जोफ्रा आर्चरच्या हाती सोपवला. इंग्लंडच्या कॅप्टनची रणनिती यशश्‍वी ठरवण्यासाठी जोफ्रानं आखूड टप्प्याचा चेंडू टाकत स्मिथला पूल शॉट खेळायला भाग पाडलं आणि तो बाद झाला.

Exit mobile version