वसाहतीत दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

| खारघर । वार्ताहर ।
सिडकोने तळोजा वसाहतीमध्ये उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून निचरा होत नाही. त्यामुळे तळोजा फेज एक वसाहतीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. तळोजा वसाहतीत सिडकोने सेक्टर 12 मध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे, मात्र सदर प्रकल्पातून सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तळोजा सेक्टर 2 मधील ग्रीन गार्डन इमारतीकडून डॉ. पाटील क्लिनिककडे जाणार्‍या रस्त्यावर तसेच काही सेक्टरमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत असून रस्त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. वाहत्या पाण्यातून शालेय विद्यार्थी आणि रहिवाशांना मार्गक्रमण करावे लागत आहे. दुर्गंधीमुळे मच्छरांचे प्रमाण वाढले असून सिडको आणि पालिकेने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

प्रक्रिया प्रकल्पात जमा होत असलेला सांडपाणी निचरा होणे आवश्यक आहे, त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून प्रयत्न केला जात आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.

– प्रीतम पाटील विभागप्रमुख, मलनिस्सारण विभाग, पनवेल महापालिका
Exit mobile version