विदेशी दारूचा साठा जप्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलिसांच्या पथकाने धाड टाकली असता नक्षत्र फार्ममध्ये विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 23 नोव्हेंबर रोजी 10.45 वाजताच्या सुमारास सावेळे गावच्या हद्दीतील नक्षत्र फार्महाऊसमध्ये आलेल्या दोघा व्यक्तींकडे विदेश दारू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे विदेशी दारू बाळगणे आणि साठा करून ठेवणे याबाबत पुरावे नव्हते. नक्षत्र फार्म हाऊस या आस्थापनेमध्ये असलेल्या ग्राहकांना बेकायदेशीररित्या कोणताही परवाना नसताना तंबाखुजन्ययुक्त हुक्का फ्लेवर व साधणे पिण्यासाठी पुरवण्याच्या उद्देशाने साठा करुन ठेवलेल्या स्थितीत मिळून आले. दरम्यान, कोणत्याही प्रकारची विदेशी दारु बाळगणे अगर साठा करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना एकूण 49,797/- रुपये किमतीची विदेशी दारु त्यांच्याकडे सापडली. याबाबत कर्जत सागरी पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार लालासाहेब तोरवे करीत आहेत.

Exit mobile version