| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नावडे कॉलनी परिसरात धाड टाकून महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व जर्दा यांचा 12 लाख 16 हजार 278 किमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील नावडे कॉलनी येथील एका दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत विविध कंपन्यांचे बंदी असलेले पानमसाला, चघळण्याचा तंबाखू व जर्दा यांचा मोठा साठा आढळून आला. त्यामध्ये प्रीमियम डायरेक्टर स्पेशल पान मसाला, प्रीमियम शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको, मारुती गोल्ड पान मसाला, एमजीटी च्युइंग टोबॅको, तुलसी 00 रॉयल जाफरानी जर्दा यांसह इतर विविध ब्रँडच्या उत्पादनांचा समावेश आहे. ही कारवाई तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जप्त करण्यात आलेला साठा ताब्यात घेण्यात आला असून संबंधिताविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार मोहिते करीत आहेत.
लाखोंचा गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त
