| पनवेल | वार्ताहर |
मानेवर काहीतरी टाकून शर्ट काढण्यास सांगून 50 हजार रुपये असलेली पैशांची बॅग दोघांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रवींद्र बळीराम हे पनवेल सहकारी बँक नवीन पनवेल येथे आले होते. त्यांच्या मुलाला 50 हजार रुपये रक्कम लागणार असल्याने बँक ऑफ इंडिया, नवीन पनवेल येथून त्यांनी 50 हजार रुपये काढले. ते काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवून बँकेतून बाहेर आले. बँकेच्या बाहेर आले असता एक अनोळखी त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांच्या मानेजवळ काहीतरी टाकले. त्यामुळे मानेवर खाज सुटली. काहीतरी असेल, पाणी टाकावे लागेल असे सांगून एकाने पाणी आणले व शर्ट काढण्यास सांगितले. त्यांनी शर्ट काढला व हातातील पैशांची बॅग बाजूला ठेवली. त्याने मानेवर पाणी टाकले. तेवढ्यात त्याचा साथीदार आला व तो बॅग चोरून निघून गेला. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
पैशांची बॅग नेली चोरून
