| पनवेल | प्रतिनिधी |
चोरीस गेलेल्या लाखो रुपये किमतीच्या 19 मोबाईलचा सीईआयआर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलीसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मुळ मालकांना सोमवारी हस्तांतरण केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सीईआयआर पोर्टचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामाना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आले होते. त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे, हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण 19 मोबाईलचा सीईआयआर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलिसांनी यशस्वीरित्या हस्तगत करून मूळ मालकांना हस्तांतरण करण्यात आले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3. पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दतील चोरीस/हरविलेले मोबाईल फोन याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना भारत सरकारद्वारे सीईआयआर पोर्टल सुरू करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे, दिलेल्या सूचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपुत, यांच्या मदतीने पोशि भीमराव खत्ताळ यांनी विविध राज्यातून आतापर्यंत एकूण 91 मोबाईल फोनची अंदाजे 2,66,000/- रूपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.







