पाटबंधारे विभागाचे कारवाईचे आदेश
| खोपोली | प्रतिनिधी |
हायको काँर्नर शेजारीच पातळगंगा नदीकाठच्या जागा मालक नदी पात्रात दगडमातीचा भराव करीत असल्याची माहिती विविध माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी यांनी रविवार (दि.14) प्रत्यक्ष स्थळपाहणी करून सत्यता तपासून पाहिल्यानंतर लघु पाटबंधारे यांना कारवाई करण्यासाठी निर्देश दिल्याने माती भरावा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर प्रशासकीय कार्यवाहीबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पातळगंगा नदीत टाटा जल विद्युत केंद्रातील पाणी सोडले जात असल्यामुळे नदी बारमाई वाहत आहे. नदीच पात्र मोठं आहे. विकासक नदीकाठची जागा विकत घेवून नदीकाठी दगडमातीचा भराव करून नैसर्गिक नदी पात्र बुझविण्याचा राजरोसपणे काम केलं आहे. असाच प्रकार हायको काँर्नर शेजारीच पातळगंगा नदीकाठी जागा मालकाने दगडमातीचा भराव करीत असल्याची विविध माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केल्यानंतर निदर्शनात आल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांनी माहिती दिली. त्यानंतर खालापूर महसूल विभागाला कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार आयुब तांबोली यांनी दिले आहे. तहसिलदार आयुब तांबोली यांनी रविवारी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून चौकशीचे आदेश दिल्याने तालुक्यात बेकायदेशीरपणे माती भराव करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.