पोलिसांच्या पथकावर दगडफेक, पाच ते सहा जण जखमी

| मुंबई | वृत्तसंस्था |

पवईच्या भीमनगरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक केल्याची माहिती आहे. यात पाच ते सहा पोलीस जखमी झाल्याचे कळत आहे.

अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि पोलीस भीमनगर परिसरात गेले होते. पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरु केली. २००७ मध्ये याठिकाणी कामगारांना तात्पुरते हलवण्यात आले. त्यानंतर याठिकाणी वसाहत उभी राहिली आहे. वारंवार प्रशासनाने ही वसाहत हटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच दृष्टीने आजही महापालिकेचे अधिकारी मोठ्या प्रमाणात पोलीस घेऊन याठिकाणी गेले होते. कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय वायकरांच्या बाजूने कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं?. येथील नागरिकांच्या रोषाला पोलिसांना सामोरे जावे लागले आहे. ज्या ठिकाणी वसाहत आहे त्याठिकाणी ह्युमन राईंट्स कमिशनने नोटीस जारी केली होती.

शासकीय वसाहत निर्माण करण्यासाठी ही जागा राखीव आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या असलेली घरे काढण्यासाठी पोलीस गेले होते. नागरिकांनी मात्र त्यांना जोरदार विरोध केला. यापूर्वी इतका तीव्र विरोध झाला नव्हता. मुंबईतून हरवलेली चार भावंड ग्वाल्हेरला सापडली, एमआयडीसी पोलिसांची कामगिरी. पोलीस आणखी फौजफाटा आणणार असल्याची माहिती मिळत आहे. कोर्टाच्या आदेशाने आपण ही वसाहत काढण्यासाठी आलो आहोत, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, नागरिकांचा याला विरोध आहे. नागरिक आणि पोलीस भिडल्याचं पाहायला मिळत आहे. दंगल नियंत्रण पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती स्फोटक बनली आहे.

Exit mobile version