| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील माटवण मोहल्ल्यामध्ये एका वृध्दाने तरूणास शिवी दिल्याच्या रागातून तरूणाने रागाच्या भरात वृध्दाच्या डोक्यावर दगड मारून इजा केली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माटवण उर्दू शाळेसमोर गुलाम मोहिद्दीन अलिमियाँ नाडकर या 65 वर्षीय वृध्दाने अर्शद मोहमद सिद्दीकी नाडकर (34) या तरूणास रंगावरून तसेच अश्लील शिव्या दिल्या. यावेळी अर्शद याने रागाच्या भरात गुलाम नाडकर याला रस्त्यावर पडलेला दगड फेकून मारला आणि दगड गुलाम नाडकर या वृध्दाला लागल्याने त्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. याप्रकरणी अर्शद नाडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.
माटवण येथे दगडाने मारहाण
