मतदार नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध नाहीत; रोहा तहसील कार्यालयाचा अजब कारभार
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तहसीलदार कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणी साठी गेलेल्या पदवीधर मतदारांना अर्ज उपलब्ध नाहीत. सेतू कार्यालयात एक अर्ज ठेवला आहे. त्याच्या झेरॉक्स घ्या, असे कार्यालयातून सांगण्यात येत असल्याने पदवीधर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दर पाच वर्षांनी नोंदणी करा, शिवाय अर्ज उपलब्ध नसल्याने झेरॉक्सचा भुर्दंड मतदारांना मागील दहा दिवसांपासून सहन करावा लागत आहे.
अर्ज उपलब्ध नसल्याने सेतू कार्यालय चालविणाऱ्या केंद्र चालकाचा मात्र यामुळे फायदा होत आहे. सेतू केंद्रातून अर्जाची झेरॉक्स घ्यायची असल्यास झेरॉक्स अर्जाचे पैसे संबंधित यंत्रणेने अदा करावेत, पण मतदारांना मोफत नोंदणी अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेकाप कार्यकर्ते जितेंद्र जोशी यांनी केली आहे.







