| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अनेकवेळा पादचारी व दुचाकी चालकांवर हे कुत्रे हल्ला करतात. अलिबाग नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. शहरामध्ये कुत्र्यांच्या निर्बिजीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी निर्बिजीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि.30) अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.00 वाजता असणार आहे. त्यानंतर अलिबाग नगरपरिषदेच्या आवारात शववाहिका वाहन आणि सेप्टीक टाकी मैला उपसा वाहनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक आदी मान्यवरांसह नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
भटक्या कुत्र्यांचे होणार निर्बिजीकरण
