| उरण | वार्ताहर |
शहरातील अनेक रस्त्यांवर दहा, बाराच्या संख्येने घोळका करून भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या श्वानांची दहशत वाढू लागली आहे. अशीच स्थिती अनेक गावांतही असून तालुक्यातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने निर्बीजीकरणाची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. उरण परिसरात शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री आणि एकट्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले जात आहे.