| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील विहूर गाव परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली आहे. या परिसरात गावाबाहेर असलेल्या शाळेमध्ये लहान मुले जात असतात. या मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हे कुत्रे धावून येतात. एकट्या लहान मुलांवर हल्ला करतात. कोंबड्या, बकऱ्या, गुरांवर सुद्धा हल्ला करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉ. नबील उलडे हिजामा सेंटर विहूर व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.







