माथेरान बाजारपेठेमधील पथदिवे बंद

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये रात्रीच्या वेळी फिरण्याची सुविधा रस्त्यावरील अंधारामुळे शिल्लक राहिलेली नाही. शहरात अनेक रस्ते अंधारात असून पालिका प्रशासन कोणत्याही समस्या सोडविण्यात येत नसल्याने शहरात प्रशासन आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यावर पावसाळ्यात झाडे कोसळली आहेत,त्यातील जंगल भागात असंख्य झाडे आजही रस्त्यावर पडून आहेत. त्या झाडाच्या फांद्या बाजूला कर्मचारी पोहचत नाहीत. यात माथेरान मध्ये आलेला पर्यटक हा रात्री उशिरा पर्यंत फिरत असतो, उन्हाळी पर्यटन हंगामापासून शहरातील अनेक रस्त्यानवरील पथदिवे पेटलेच नाहीत. आता तर भर बाजारात पथदिवे असलेल्या भागात देखील अंधाराचे साम्राज दिसून येत आहे. त्यामुळे माथेरान मध्ये प्रशासन काम करतेय काय? असा प्रश्न सर्वांपुढे आहे. पालिका प्रशासनाने किमान दिवाबत्ती आणि सांडपाणी व्यवस्थापन मध्ये लक्ष घालून पर्यटनासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी आपले स्वच्छ शहर स्वच्छ आहे हे दाखवून देण्याची गरज आहे.शासनाने जागतिक दर्जा म्हणून मिरवणाऱ्या माथेरान या पर्यटन स्थळाच्या दैनंदिन देखभाली साठी आवश्यक असलेले मुख्याधिकारी दर्जाचा अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी गेली पाच महिने सातत्याने केली जात आहे.

Exit mobile version