| मुंबई | प्रतिनिधी |
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर राज्यभर संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या घटनेवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल देण्यावर कडक निर्बंध आणण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारकडून बलात्कार आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारण्यासाठी कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विधी व न्याय विभागाला याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी हा ‘हॅबिच्युअल ऑफेंडर’ असल्याचे समोर आले असून, पॅरोलवर सुटलेल्या आरोपींकडून पुन्हा गुन्हे घडत असल्याची बाबही अधोरेखित झाली आहे. त्यामुळे पॅरोल आणि फर्लो नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. तसेच, नसरापूर प्रकरणाचा खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा, आवश्यक असल्यास फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आरोपींना पॅरोल देण्यावर कडक निर्बंध

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606