उरणमध्ये कडकडीत बंद

बंदला जनतेचा 100% प्रतिसाद
। उरण । वार्ताहर ।
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
उरण मध्येही महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेश घटनेचा निषेध करत उरणमध्ये कडकडीत बंद पाळला.उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटना, व्यापारी संघटना,टॅक्क्षी संघटना, वाहतूक संघटना यांनी आपले दुकानें, वाहने बंद करून कडकडीत बंद पाळला.उरण शहर, उरण ग्रामीण भाग,पूर्व विभाग,द्रोणागिरी नोड आदी विभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी उरण बाझारपेठ, गणपती चौक, राजपाल नाका, गांधी चौक आदी ठिकाणी रॅली काढून उत्तर प्रदेश मधील लखीमपूरला शेतकर्यांना चिरडून मारणार्या केंद्र सरकार व योगी सरकारचा निषेध केला.महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद मध्ये संपूर्ण उरण तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद कडकडीत पाळण्यात आला.
यावेळी प्रशांत पाटील, मनोहर भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, जे डी जोशी,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच समाजवादी पार्टीचे उरण शहराध्यक्ष राशीद ठाकूर यांनी दिली.यावेळी पंचायत समितीचे सभापती समिधा म्हात्रे, नरेश रहाळकर, आदी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version