न्यू बाँम्बे कंपनीच्या विरोधातील उपोषणाला तुर्तास स्थगिती

नायब तहसीलदारांची मध्यस्थी
| खोपोली | वार्ताहर |

जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील न्यू बाँम्बे कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याने नागरिक या कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करित असताना या कंपनीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती महेश पांचाळ यांनी तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या उपोषणबाबत नायब तहसीलदार कल्याणी कदम यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तृप्ती पांचाळ यांना सत्कारात्मक प्रतिसाद दिल्याने तुर्तास तृप्ती पांचाळ यांच्या उपोषणाला स्थगिती मिळाली आहे. यावेळी पं.स. सदस्य अक्षय पिंगळे, माजी उपसभापती श्याम साळवी, महेश पाटील, गिरीश जोशी,महेश पांचाळ, अर्चना दळवी, सुहासिनी सावंत, मनिषा गायकवाड, लिला गायकवाड, जयवंती शिपुसकर, शशिकला शिळकर, शिवम सावंत, वसंत शिळकर, रामचंद्र जाधव, संदीप जाधव, आदित्य शिर्के, संतोष शिळकर उपस्थित होते.

पुढील काही दिवसात प्रदूषण मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक तहसीलदार कार्यालयात न झाल्यास तृप्ती पांचाळ ह्या पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे मत नायब तहसीलदार कल्याणी कदम यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले आहे.

Exit mobile version