| आगरदांडा | प्रतिनिधी |
आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देण्यात आले होते. मात्र, शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार आपल्या विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात फलक घेऊन बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
निवेदनात विविध मागण्या पुढीलप्रमाणे नायब तहसीलदार (राजपत्रित) वर्ग -2 पदांची वेतन श्रेणी व ग्रेड पे -4 हजार 800 रुपये करण्याची मागणी होत आहे. दर्जा वर्ग 2 मग वेतन श्रेणी वर्ग-3ची का, असे या नायब तहसीलदारांमध्ये बोलले जात आहे. सातत्याने शेतकरी, कष्टकरी, वंचित, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या हितासाठी महसूल विभाग सतत कार्यरत आहे. तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने यापूर्वी 1998 पासून वारंवार नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -2 पदाची वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी निवेदन दिले आहे.
यावेळी तहसीलदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ, तहसीलदार गोविंद वाकडे, नायब तहसीलदार मनोज गौतरणे, नायब तहसीलदार गोविंद कौटुंबे, नायब तहसीलदार रवींद्र सानप तसेच जिल्हा कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसीलदार एकूण 65 अधिकारी यांनी काम बंद आंदोलनात सामील होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित आहे.