कुपोषणमुक्त रायगडसाठी प्रयत्नशील रहा

तालुका आरोग्य अधिकार्‍यांचे आवाहन
पोषण आहार मास साजरा

| नेरळ | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी यांनी रायगड जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी राबविलेल्या पोषण आहार महिना आता आपण सर्वांनी दैनंदिन कामकाज म्हणून यापुढे ते सर्व कार्यक्रम आचरणात आणले तर कुपोषण दूर होईल, असा आशावाद कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी.के. मोरे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला पोषण आहार महिना कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या महिन्याचा समारोप नेरळ येथे कार्यक्रमात करण्यात आला.या महिन्यात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम यांच्यामधून आदर्श अंगणवाडी,सदृढ बालक स्पर्धा,गर्भवती महिलांसाठी विशेष आहार याबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नेरळ येथे झालेल्या समारोप कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी मोरे बोलत होते.

नेरळ येथील समारोप सोहळ्याला तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे, महसूल नायब तहसीलदार विजय राऊत,तालुका पशुधन अधिकारी डॉ मिलिंद जाधव,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर,नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पवार,महिला बालविकास विभागाच्या विस्तार अधिकारी अनिता ढमढेरे,डी एच पाटील,नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयक शिल्पा बंगसे,कशेळे विभागाचे आशा भाल,तसेच आरोग्यसेविका आर आर मानकर, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी तालुका पशुधन अधिकारी डॉ जाधव यांनी लंम्पि रोगाबद्दल माहिती देऊन या रोगाविषयी जन्जारुती करण्याचे आवाहन अंगणवाडी सेविका यांना केले.

अंगणवाडी स्तरावर सुदृढ बालक स्पर्धा तसेच आदर्श अंगणवाडी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कर्जत तालुक्यातील 400 अंगणवाडी केंद्र येथे या पोषण आहार महिन्याची मोहीम राबविण्यात आली असून प्रकल्प दोन मधील 150 अंगणवाडी केंद्रांचा प्रकल्पाचा पोषण आहार महिना समारोप कार्यक्रम नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कर्जत तालुक्यात युनायटेड वे हि संस्था सर्व उपक्रम राबविण्यासाठी आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागाला मदत करीत आहे.

कुपोषण कमी करण्यासाठी सर्व यंत्रणा राबविणार्‍या युनायटेड वे या संस्थेचे आरोग्य अधिकारी डॉ शैलेश वनवे,प्रक्लप व्यवस्थापक आर बी जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तर तालुक्यातील 150 अंगणवाडी मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक समारंभ या कार्यक्रम मध्ये करण्यात आला. त्या आदर्श अंगणवाडी म्हणून तळवडे,खांडस,मानिवली,चांदई,कोठिंबे या पाच अंगणवाडी केंद्र यांचा संक्रमण करण्यात आला. तर सुदृढ बालक स्पर्धात शून्य ते तीन वर्षे वयोगटात बांधिवली अंगणवाडी केंद्रातील दिगंबर शिंदे या बालकास प्रथम क्रमांक तर दुसरा क्रमांक एकसळ अंगणवाडी केंद्रातील आर्यन बोराडे आणि तिसरा क्रमांक आसल केंद्रातील वीर गायकवाड या बालकास देण्यात आला.तीन ते सहा वर्षे वयोगट मध्ये उकरूल केंद्रातील कनिष्का कदम हीच प्रथम तर आषाणे केंद्रातील यश ठाकरे या बालकास दुसरा क्रमांक आणि खांडस अंगणवाडी केंद्रातील आर्वी जाधव हीच तिसरा क्रमांक आला.

Exit mobile version