| अलिबाग | प्रतिनिधी |
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नामंकित शाळेतील घटना निंदनीय आहे. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अशा घटनांकडे सरकार आणि महिला आयोगाचा अंकूश राहिला नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. शाळेतील मुलींसह महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या न्यायासाठी पूढील काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला. तसेच मुलींची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सरकारने शासन स्तरावर स्वतंत्र समिती गठीत करून या समितीमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी असावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून महिलांवरील लैगिंक अत्याचाऱ्याच्या घटना वाढत आहे. सातत्याने या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलींसह वयोवृध्द महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नामंकित शाळेतील घटना निंदनीय आणि किळसवाणी आहे. तीव्र शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळांवरील प्रशासनावर सरकारचा अंकूश राहिला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहे. विद्यार्थीनी, महिला कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केला जात आहे. सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची शेतकरी कामगार पक्षाची भुमिका राहणार आहे. पिडीत मुली, महिलांसह त्यांच्या पालकांच्या न्याय हक्कासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन केले जाईल.
महाराष्ट्र सरकार आणि महिला आयोग मुलींसह महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास अपयशी होताना दिसत आहे. शाळकरी मुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना न्यायाची भूमिका पार पाडत नाही. यांचा अंकूश राहिला नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे.
सरकारने महिला, मुलींच्या अत्याचारांच्या घटनांबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शाळेतील विद्यार्थीनी, महिला कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी शासन स्तरावर स्वतंत्र समिती गठीत होणे गरजेचे आहे. या समितीमध्ये सर्वपक्षीय प्रतिनिधी असावे. तरच न्याय, सुरक्षा अबाधित राहू शकते ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे, असे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील एका नामंकित शाळेतील घटना निंदनीय आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण्ा महाराष्ट्र या घटनेने हादरुन गेला आहे. या घटनेचा शेकापच्या वतीने तीर्व निषेध व्यक्त केला जात असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, ही मागणी आहे.
चित्रलेखा पाटील – शेकाप प्रवक्त्या तथा मिडीया सेल अध्यक्षा







