| मुंबई | वार्ताहर |
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजारात दिसणारी तेजी शुक्रवारीही कायम होती. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली. या आधारावर बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख देशांतर्गत निर्देशांकांनी नवीन विक्रम निर्माण केला. व्यवहार संपल्यानंतर बीएसईचा 30चे शेअर्स असलेला सेन्सेक्स 502 अंकांच्या म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 66,060 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने आजच्या व्यवहाराला 65,775.49 अंकांच्या तेजीसह सुरुवात केली. याआधी गुरुवारी सेन्सेक्स 65,558.89 अंकांवर बंद झाला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 151 अंकांच्या म्हणजेच 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 19,564 अंकांच्या वर बंद झाला. गुरुवारी तो 19,413.75 अंकांवर होता. व्यवहारात, निफ्टीने 19,595.35 अंकांचा उच्चांक गाठला.