भारतात फुटबॉलची मजबूत पायाभरणी

नवोदीत टॅलेंटसाठी अहमदाबादमध्ये रंगणार ग्रँड फिनाले


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि यूएईतील शहरं आणि गावांमध्ये फुटबॉलसाठी चाचणी घेण्यात आल्या. त्यानंतर आता इंडिया फुटबॉल खेलो सिझन 3 साठी काही निवडक खेळाडू सज्ज झाले आहेत. 4 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील एका अरेना येथे ब्लॉकबस्टर अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेशाठी 13 ते 17 वयोगटातील 150 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी फुटबॉल ट्रायल असून टॉप क्लब आणि अकादमींना आकर्षित करण्याचा उद्देश आहे.

इंडिया फुटबॉल खेलो या उपक्रमाची 2020 मध्ये स्थापना झाली असून एक ना नफा उपक्रम आहे. फुटबॉल आणि व्यवसायिक फुटबॉल यातील अंतर कमी करण्याचा यामागे उद्देश आहे. शहरं, गावखेड्यांमधील उत्तम खेळाडूंना संधी देण्याचा प्रामाणिक हेतू आहे. या माध्यमातून फुटबॉलपटूंना भारतीय क्लब, तसेच आंतरराष्ट्रीय अकादमी आणि युनाईटेड स्टेट फुटबॉलसाठीचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

फुटबॉलच्या या मोहिमेत आतापर्यंत 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. 2006 ते 2011 या जन्मलेल्या मुलांनी आणि 2007 ते 2011 या कालावधीत जन्मलेल्या मुलींना यात भाग घेतला. यातून 150 सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आता उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर पूर्व अशी पाच गटात विभागणी होईल. यातून क्लब आणि अकादमींना खेळाडूंची निवड करता येईल.

जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स, गोवा एफसी, मुंबई सिटी एफसी आणि चेन्नईयिन एफसी हे इंडियन सुपर लीग क्लब खेळाडूंची पारख करणार आहेत. तर, आय लीग क्लब गोकुलम केरळ, दिल्ली एफसी, बडोदा एफए, एआरए, महाराष्ट्र ऑरेंज एफसी आणि युनायटेड एससी कोलकाता यांचाही खेळाडूंवर नजर असेल. एफसी मद्रास, , अल्फा स्पोर्ट्स अकादमी, विशाल बिहार युनायटेड, स्पोर्टो आणि नॉर्दर्न युनायटेड यांसारख्या देशातील काही आघाडीच्या अकादमी या स्पर्धेत सहभागी होतील.

देशातील नवोदित फुटबॉलपटूंना भारतीय फुटबॉलच्या मोठ्या दिग्गजांसमोर त्यांची प्रतिभा दाखवण्याची सुवर्ण संधी आहे. इंडिया खेलो फुटबॉल हे त्यासाठी एक माध्यम ठरणार आहे. आता आपली चमक दाखवणाऱ्या खेळाडूंना भविष्यात चांगली संधी मिळणार, यात शंका नाही.

Exit mobile version