पेणमध्ये गटारीची युवापिढीकडून जोरदार तयारी

| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील युवापिढीला दोन दिवसावर आलेल्या गटारी आमावस्येचे वेध लागले असून, यानिमित्ताने पार्टी साजरी करण्यासाठी विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात साग्रसंगीत तयारी सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

अवघ्या दोन दिवसांवर गटारी आल्याने मित्र मंडळींचेकडून गटारी कुठे व कशी दणक्यात साजरी करायची याचे बेत आखले जाऊ लागले आहेत.पेण तालुक्यात पनवेल,उरण, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी मोठया शहरातील पर्यटकांची पाऊले पेण तालुक्यातील आलिशान फार्म हाऊसेसकडे पडू लागली आहेत.अनेकजण या निमित्ताने पावसाळयात बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात गटारी तथा पार्टी करण्यासाठी पावसाचा आनंद घेण्यासाठी दाखल होणार आहेत. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळतात.त्यापूर्वी ही गटारी साजरी केली जाते.


मद्य, मटण मच्छी विक्रीत वाढ
गटारी साजरी करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने या दिवशी मद्यांच्या दुकानांवर अक्षरशः लांबच लांब रांगा लागतात. याचाच फायदा घेउन दमन, गोवा येथील स्वस्त दरातील दारु चढया भावाने विक्रीसाठी आणली जाते. मटण मासळी बाजारातही ग्राहकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते. त्यामुळे व्यावसायिकांना चार पैसे अधिक लाभ होतो. बोकडाचे मटण 700 रुपये किलो ,चिकन 240, जिताडे 700, पॉपलेट ,सुरमई 1200 ते 1500 खेकडा 4 नग 500 रुपयेने उपलब्ध होते.

पोलिसांची नजर
पेणेमध्ये बाहेरुन आलेले आमलीजन्य पदार्थ व दारु याची विक्री ब्लॅकनेे होणार हे नक्की. ही विक्री नक्की कोणत्या फार्महाऊसवरुन होते. हे शोधणे पोलीसांसमोर एक मोठे आवाहन आहे. तसेच, या मोठ मोठया गटरीच्या पाटर्यामध्ये रम,रमा, रमीचा अस्वाद घेणारे अनेक आंबट शौकीन महानगराकडून पेणमध्ये दाखल होणार आहेत.तरी यांचा शोध घेणे देखील पोलिसांना खुप मेहनतीचे व जबाबदारीचे आहे.

Exit mobile version