| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये मोफत वायफास सेवा सुरु केली होती. मात्र, दोन वर्षात ही सेवा बारगळी. 2017 मध्ये सुरू केलेली ही योजना बंद पडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
गाव-वाड्यात राहणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्यायी मार्ग उपलब्ध लागला. ज्यादा पैसे मोजून निश्चित स्थळी वेळेवर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे अनेकजण एसटी बसपासून दुरावलेले होते. एसटीतील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने 2017 मध्ये बसमध्ये मोफत वायफाय सेवा सुरु केली. ‘यंत्र मीडिया सोल्युशन’ या कंपनीमार्फत ही सेवा सुरु करण्यात आली होती.
या वायफायमुळे प्रवाशांना सिनेमांंबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजानाचे कार्यक्रम एसटी बसमधून पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे या उपक्रमाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सर्वजण एसटीतून प्रवास करू लागले. मात्र, दोन वर्षातच ही योजना बारगळी. कंपनीला ही सेवा देणे न परवडण्यासारखे झाले. त्यामुळे वायफाय सेवा बंद करण्यात आली. त्याचा परिणाम एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची
निराशा झाली. ही योजना बारगळ्याने प्रवाशांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ विविध योजना राबवित आहे. दरवर्षी प्रवासी वाढवा अभियान राबविले जाते. एसटी महामंडळात शिवशाही बस आणून नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या बसमध्ये वातानुकूलित यंत्र बिघडलेले, पडदे फाटलेले अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे याकडे महामंडळ विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
एसटीची वायफाय सेवा बंद
