रायगड जि. प. शाळेत विद्यार्थिनीला मारहाण

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर उपनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने बेदम मारहाण केली. शिक्षिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कारवाईची मागणी केल्यानंतर शिक्षिकेने माफीनामा सादर केला.

खारघर गावातील सेक्टर 13 येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळेत 500 हून अधिक विद्यार्थी शिकतात. 6वी इयत्तेत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या विद्यार्थीनीला शिक्षिकेने सोमवारी मारहाण केली. यामुळे या विद्यार्थिनीच्या अंगावर व्रण उमटले. घडला प्रकार घरी सांगू नकोस, असा दमही शिक्षिकेने भरला.
विद्यार्थिनीने पालकांना हा प्रकार सांगिल्यावर त्यांनी मंगळवारी शाळेत जाऊन जाब विचारला. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पालकांसमोर पुन्हा असा प्रकार होणार नाही, अशी हमी दिली. विद्यार्थीनीने मोबाइल संभाषणात शिक्षिकेला उद्देशून अपशब्द वापरल्याने हा प्रकार घडल्याचे मुख्याध्यापकांना सांगितले. मुलगी तिच्या वर्गमैत्रिणीशी अभ्यासाविषयी मोबाइलवर चर्चा करताना शिक्षिकेबद्दल तिने गैरशब्द उच्चारला. या संभाषणाचे रेकोर्डिंग व्हॉट्सॲप ग्रुपवरून संबंधित शिक्षिकेपर्यंत पोहोचले.

Exit mobile version