पुन्हा विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात; चिमुकलीचा मृत्यू

| हरियाणा | वृत्तसंस्था |

हरियाणा येथील यमुनानगर येथे मुलांच्या रिक्षाला अपघात झाला आहे. रिक्षा चालकाने लाल सिग्नल तोडल्याने मोटारसायकल आणि रिक्षाचा गंभीर अपघात झाला. यात दुर्दैवाने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी हरियाणा येथील महिंद्रगड येथील कनीनी येथे गुरुवारी (दि.11) एका स्कूल बसचा अपघात झाला होता. या घटनेत सहा मुलांचा मृत्यू झाला होता. बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचे पुढे आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षामध्ये शाळकरी विद्यार्थी होते. रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर पाच मुले जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मृत पावलेली विद्यार्थीनी हिमानी ही तिसरीच्या वर्गात शिकत होती. अपघातानंतर नातेवाईकांनी तिला एका रुग्णालयात नेले होते. परंतु तिचा मृत्यू झाला होता.


Exit mobile version